औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन तर्फे जागतिक छायाचित्र निमित्त कार्यक्रम संपन्न

औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन तर्फे जागतिक छायाचित्र निमित्त कार्यक्रम संपन्न

संघटन फार महत्त्वाचं डॉ. तेजनकर. असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार- पोलिस आयुक्त पवार.

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन तर्फे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अशोक तेजनकर, प्राचार्य, देवगिरी महाविद्यालय यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अध्यक्ष किशोर निकम, सतीश जोशी, सतीश साखरे, दीपक काकडे, संजय चुबे, सचिन गोडसे, किरण धुमाळ, रमेश रावळे उमाकांत वैध त्यांच्या उपस्थिती संपन्न झाला. प्राचार्य तेजनकर सर च्या सत्कार सचिव सतीश जोशी यांनी केले. उद्घाटन पर भाषण करताना डॉ. तेजनकर म्हणाले संघटनेचे महत्त्व खूप मोठा असतं. संघटना असली म्हणजे आपली एकी दिसते. आपण हक्काने लढू शकतो

. संघटन कसं महत्त्वाचं आहे याबद्दल त्यांनी उदारणासह त्यांनी माहिती दिली. उद्घाटनानंतर सोशल मीडियाचा वापर करून आपल्या व्यवसाय कसा वाढवावा यावर श्री हर्षवर्धन शाही यांनी खूप महत्त्वपूर्ण व उदाहरणासह माहिती दिली. आपला व्यवसाय कसा वाढेल व आपण ग्राहकाशी असं वागावे. आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग आपण कशी करावी, ग्राहकाशी कसं वागावं आणि सोशल मीडिया चा वापर आपल्या व्यवसायासाठी कसा करावा यांची उदाहरणासह पूर्ण माहिती श्री. शाही यांनी दिली. त्यांनी प्रश्न उत्तरातून सर्वांचे शंका दूर केल्या. औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन तर्फे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त साठ वर्षावरील ज्येष्ठ छायाचित्रकार, वृत्तपत्र छायाचित्रकार, व्हिडिओ जनलिस्ट यांचा सत्कार मा. श्री प्रवीण पवार, पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना श्री पवार म्हणाले मी प्रशासकीय अधिकारी असलो तरी मला फोटोग्राफीची खूप आवड आहे. संघटनेसाठी मी सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे. संघटनेच्या कार्यालया साठी मी स्वतः पुढाकार घेईल व यासंदर्भातील सर्वांशी मी बोलण्यासाठी मी तुमच्या बरोबर येईल. असोसिएशनचे अध्यक्ष किशोर निकम यांनी पोलीस

आयुक्त श्री प्रवीण पवार यांचा सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार श्री. गौतमकुमार जैन, प्रकाश नागापूरकर, बसवराज जिबकाटे, विनयकांत सोळंकी, राजेंद्र पावले, प्रकाश गुजराती, गुजाफर हुसेन, रवी मुदळवाडकर, बाबुराव हरकळ, प्रकाश कहाळेकर, बी. के. परमार, प्रदिप राजनगावकर, गुलाबराव सूद, रंजन देसाई, गोविंदराव गव्हाणे, चिंकू रत्नाजी भिसाडे, हरीश मेवाणी, बबन देवकर वृत्तपत्र छायाचित्रकार श्री. फिरोज खान, शेख मुनीर, शकील खान, सचिन लहाने, मनोज पराती, रवि खंडाळकर, योगेश लोंढे, हुसेन जमादार, सचिन माने, अरुण तळेकर, स्नेहिल साखरे, मंगेश शिंदे, शेख फारुख, राजू शेख, बाळू देशमुख, श्री मच्छिंद्र नागरे, चंद्रकांत थोटे, सुनील थोटे, व्हिडिओ पत्रकार श्री. धनंजय दारुंटे, सुधीर जाधव, मोहम्मद तोफिक, इरफान मोहम्मद, अमित आडे, हर्षल निकम, अमोल वाघुले, अमोल देशमुख, कपिल जाधव, जीवन पाटील, सतीश खरात या छायाचित्रकार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महावीर लॅबचे सुनील पांडे सचिन गोडसे शंकर रामचंद नी केलेल्या सहकार्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र छायाचित्रकार योगेश लोंढे व फिरोज खान यांनी वृत्तपत्रात काम करतानाचे अनुभव सांगितले यावेळी असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धा आणि व्हिडिओ रिल स्पर्धेचे निकाल परीक्षण विनयकांत सोळंकी, संजय चूबे, पुरुषोत्तम देशपांडे, सतीश जोशी यांनी केले व पुरस्कार जाहीर केले. कार्यक्रम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण धुमाळ व समारोप उमाकांत वैद्य यांनी केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष किशोर निकम, सचिव सतीश जोशी, सतीश साखरे, रमेश रावळे, नितिन महाजन, दीपक काकडे, उमाकांत वैद्य, किरण धुमाळ , संजय चुबे, अक्षय अहिरराव, गणेश निकम, गणेश वासलवार यांनी परिश्रम घेतले.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *