औरंगजेबच्या कबरीवरून तणाव: सुरक्षा वाढवली, राजकीय वातावरण तापले

औरंगजेबच्या कबरीवरून तणाव: सुरक्षा वाढवली, राजकीय वातावरण तापले

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी सविता पोळके ) : छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापले आहे. बजरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली असून, ती आमच्या गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देते, असा दावा केला आहे. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी, अन्यथा स्वाभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा बजरंग दलाने दिला आहे. धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनीही कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, काँग्रेसने या मागणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, “औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंटबाजी करू नये. औरंगजेबाची कबर ही वीरत्वाची नाही, तर क्रौर्याची साक्ष आहे

. त्यामुळे ती कबर शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक लढ्याची आठवण आहे.” यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “२७ वर्ष औरंगजेबाला येथे राहून राज्य करता आले नाही. त्याचं प्रतीक म्हणून औरंगजेबाची कबर आहे. आज ती काढून टाकली तर भविष्यात लोक गडबड करतील. त्यामुळे एक प्रतीक म्हणून त्या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल.”

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *