छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र. C-21 आणि C-22 या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. औद्योगिक विकासासाठी संपादित केलेल्या या जमिनी धनदांडग्या भू-माफियांनी काही अधिकाऱ्यांच्या मदतीने हडपल्याचा आरोप केला जात आहे. “इन्सपायरा सिटी” या नावाने त्या भूखंडावर अनधिकृतपणे प्लॉटिंग करून विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, औद्योगिक क्षेत्रातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भू-माफियांच्या सोबत संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे या जमिनींवर हक्क मिळवण्याचा डाव आखला आहे.

औद्योगिक विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे हक्क पायदळी तुडवले जात असून, या प्रकारामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहेत.या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून, भू-माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.