नवी दिल्ली : देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असून देशभक्तीच्या वातावरणात प्रत्येकजण जुन्या आठवणी जागवताना दिसून येत आहेत. यंदा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असून राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जाणार आहे. तर, दुसरीकडे दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमधील एका कार्यक्रमात पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फाळणी विरोधी स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे. पाकिस्तानचे एकतर भारतात विलगीकरण होईल किंवा पाकिस्तान इतिहासातून कायमचा नष्ट होईल, असे मुख्यमंत्री योगी यांनी म्हटले आहे.
जेव्हा अध्यात्मिक जगतात एखाद्याचं वास्तविक स्वरुप नसतं, तेव्हा त्यास नष्ट व्हावेच लागेल

. त्यांच्या नस्वरतेकडे आपण संशयाच्या नजरेतून पाहिलं नाही पाहिजे. आम्ही
हेच मानलं पाहिजे की ते होईल. मात्र, त्यासाठी आम्हालाही तयार असावेच लागेल. आपल्याला त्या चुकांवर विचार करावा लागेल, ज्यामुळे विदेशातील दृष्ट शक्तींना भारतात घुसणे आणि आपल्या देशातील पवित्र स्थळांवर हल्ला करण्याची संधी मिळते. भारताची अखंडता आणि संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी आपणास ते करावेच लागेल. विभाजनचा विचार सोडून राष्ट्र म्हणून आपण एकच विचार केला पाहिजे. जातीय, प्रादेशिक आणि भाषिक विभाजनाच्या पुढे जाऊन आपण राष्ट्र प्रथम हा मंत्री अंगीकरुन काम केलं पाहिजे, असे योगी आदित्यनाथ यांनी लखनौमधील कार्यक्रमातून बोलताना म्हटले आहे.