ऊंडणगाव (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.१/६/२०२५ पासुन बालाजी उत्सवास सुरुवात झाली असून उत्सव काळात प्रथेप्रमाणे गावात भगवान बालाजींची भव्य पालखी मिरवणूक काढली जाते. ही भव्य पालखी मिरवणूक संपूर्ण गावातुन वाजत गाजत काढली जात असुन या सोहळ्याला गावातील संपूर्ण नागरिक माता भगिनी सहभागी झाले असतात तर मिरवणूकीनंतर् भगवान बालाजीची मंदिरात पुजा अर्चा अभिषेक करत मुर्तीची स्थापना केली जाते. हा उत्सव म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. तसेच गावात गावपंगतीचे देखील आयोजन केलेले असते

.याच उत्सव काळात गावात नविन कैरीचे लोणचे तयार न करण्याची जुनी प्रथा रूढ असुन, नविन वस्तू, वस्त्र देखील न घेणे, गावात मांस पदार्थ विकले जात नाही पापड तळणे व्रज समजले जाते थोडक्यात असे एक गाव की भगवान बालाजीच्या उत्सव काळात नविन वस्त्रे न घेणे, कैरीचे लोणचे न बनवणे, नविन वस्तू खरेदी न करणे तसेच उत्सव काळात दाढी कटींग देखील न करणारे असे ख्याती या गावाची
सर्वदुर पसरली आहे. तसेच या उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम, आरोग्य शिबीर, तसेच कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, दररोज अन्नदान, श्री च्या मुर्तीला अभिषेक, भजन, हरिपाठ दररोज असे कार्यक्रम नित्यनेमाने केले जातात. ऊंडणगाव येथील हा उत्सव म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा उत्सव होय.या वर्षी या उत्सव काळात दिनांक. १जुन् ते ११जुन या उत्सव काळात खालील मान्यवरांनी अन्नदान व पंगत देण्याचा कार्यक्रम ठेवला
आहे.