उपजिल्हाधिकाऱ्यांवरील कौटुंबिक छळप्रकरण; पत्नी व मित्र अटकेत !

उपजिल्हाधिकाऱ्यांवरील कौटुंबिक छळप्रकरण; पत्नी व मित्र अटकेत !

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र तुकाराम कटके यांना त्यांच्या पत्नीने छळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने तिच्या मित्राच्या मदतीने कटके यांच्याशी अपमानास्पद वागणूक ठेवली आणि त्यांच्यावर अघोरी विद्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी पत्नी, तिचा मित्र आणि इतर सहा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी व जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. २०१५ मध्ये दिवाळीच्या रात्री पत्नी कोणाशी तरी चॅटिंग करत असल्याचे कटके यांनी पाहिले होते. त्यांनी तिच्या कुटुंबीयांना ही बाब सांगितली, मात्र समजूत घालून प्रकरण मिटवण्यात आले.

२०१९ मध्ये कटके मुंबईत नोकरीला असताना त्यांची पत्नी आणि मुलगा संभाजीनगरमध्ये राहत होते. २०२१ मध्ये पत्नीने बोरखडी येथे ग्रीनलँड स्कूल सुरू केले आणि त्याठिकाणी तिच्या मित्राचे हॉटेल होते. कटके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह छायाचित्रे आणि रेकॉर्डिंग आढळले. त्यांचा मित्र विनोद उबाळे अघोरी विद्या करत होता आणि त्याचा वापर करून कटके यांना मारण्याचा कट रचला गेला होता. या जादूटोण्याच्या माध्यमातून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनोद उबाळे, पत्नी सारिका देवेंद्र कटके, सासू सुवर्णा देशमुख, मेहुणा आतिश देशमुख यांच्यासह अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे आणि प्रवीण वाघ यांनी संशयितांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील करत आहेत.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *