शेलारांच्या वक्तव्यांची आठवण करुन देत सुषमा अंधारेंची टीकाबई
मुंबई – : आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सागा ना म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी, सगळं देता येईल.. असा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना लगावला आहे. दरम्यान महाविकास आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रात १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेणार, अशी घोषणा भाजपाचे आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. सुषमा अंधारे यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी,रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी, सगळं देता येईल

अशी खोचक टीका करत अंधारे यांनी शेलार यांना टोला लगावला. आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी सगळं देता येईल.. असा खोचक टोला लगावला आहे. आशिष शेलार यांचा विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या उत्तर मध्य मुबई मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. आशिष शेलारांनी तिकीट नाकारल्यानंतर तिथून उज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला, पण त्यांच्या एनडीएचे बहुमत हे टेकूवरचे आहे व ते टेकूही डळमळीत आहेत. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी व त्यांच्या अमित शहांना निरोप दिला आहे. त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला आहे. सत्ता टिकविण्यासाठी पुन्हा भ्रष्ट मार्गाचा, फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल. देशातील लोकशाहीचा अफाट, अपूर्व, अलौकिक विजय झाला आहे. देशाच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, तो तसाच राहील