अजिंठा : जिवंत काडतुसासह कमरेला गावठी कट्टा बांधून ट्रॅव्हल बसने प्रवास करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो अट्टल गुन्हेगार निघाला. त्यांच्याविरोधात पुणे येथील पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवाय गावठी कट्टाही त्याने तुरूंगातील एका कैदयाच्या माध्यमातून घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे. दहा जिवंत काडतूस, गावठी कट्टासह जळगावकडून छत्रपती संभाजीनगर ट्रॅव्हल बसने प्रवास करणाऱ्या मयुर सतीष भरेकर (२८, रा. कोथरुड पुणे) याला अजिंठा पोलिसांनी शुक्रवारी (दि.१९) रात्री ११ वाजेच्या सुमारास पकडले होते. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याची दोन दिवसांची कोठडी सुनावली. आरोपी मयुर याच्याविरुद्ध पुणे येथे विविध पोलीस ठाण्यात चोऱ्या, मारामाऱ्या, शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे असे अनेक विविध गुन्हे दाखल आहेत.

तुरुंगातूनच कट्ट्यासाठी लावली फिल्डिंग
एका गुन्ह्यात तुरुगात असताना मयुरची ओळख शिक्षा भोगत असलेल्या एका दुस-या कैद्याशी झाली. तुरुंगातून आल्यानंतर त्याने व्याज्याने पैसे देणे सुरू केले होते, लोकांना घाबरविण्यासाठी व स्वतःच्या बचावासाठी त्याने तुरुंगात भेट झालेल्या दुसऱ्या कैदवाली संपर्क साधून बिहार येशील छपाय देवून गावटी कट्टा व जिवंत काडतुसथी खरेदी केली या दरम्यान त्याला तीन गावठी कट्टे असल्याचे भासवून एकच गावठी कट्टा पेंकिग करून देण्यात आल्याची माहिती पोलिसांना कोठडीदरम्यान आरोपीने दिली याबाबत अजिंठा पोलिस आरोपीची कसून वीकली करीत आहे.