आरोग्य अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जग-दीश बिरसने

आरोग्य अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जग-दीश बिरसने

जिओ या मरो आमचं काय जातंय अधिकाऱ्यांना पाठीशी घालत. मनपा आयुक्तांचा उपोषणाकडे काना डोळा

!छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : -प्रोप्रा. राजेंद्र दौंड, GSTIN 27AFGPD2089D1ZP कृष्णगोपाल औषधालय, आंचल 24 कॉम्प्लेक्स, गजानन मंदिर, छ. संभाजीनगर येथे बोगस डॉक्टर म्हणून श्री राजेंद्र दौड या ठिकाणी धाड सत्र टाकत असतांना महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी पोलीस स्टेशनशी हात मिळवणी करुन राजेंद्र दौड यांला धाड मोहीमे अगोदरच लय सतर्क केले, म्हणून महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी व इतर जबाबदार अधिकारी यांचेवर कार्यवाही करुन राजेंद्र दौड या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी, यासाठी दि. ०७/०५/२०२४ रोजी पासून आपल्या कार्यालया- – समोर उपोषण चालू आहे,

सदरील उपोषण शांततेच्या मार्गाने चालू असून सुध्दा ३.११/०५/२०२४ रोजी माझ्यावर भादंवि कलम १८८ व १८६ अन्वये गुन्हा दाखल करुन महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुषमा शिवाजीराव धनवाले यांनी खोटी फिर्याद दिली, यामुळे माझे सार्वजनिक जीवनमान मलिन झाले आहे, तसेच, माझ्या मानवी हक्कावर गदा यावी, यासाठी मी करत असलेले जनसेवेसाठीचे उपोषणापासून मला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहे, मा. पोलीस स्टेशन सिटी चौक यांना दि.१०/०४/२०२४ रोजी तक्रार दिली असता त्यावर कसलीही कारवाई न करता उलट माझ्यावरच मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला हाताशी धरुन संगनमत करुन मी अनुसूचित जातीचा असल्याने माझ्यावर चुकीच्या पध्दतीने दबाव आणत आहे, तरी तात्काळ चौकशी होवून कारवाई व्हावी, ही विनंती. समाजसेवक जगदीश बिरसने यांनी केली आहे

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *