पोलीस प्रशासन व न्यायालयाची दिशाभूल करून दि.२८/०३/२०२४ दिले खरेदीचे जाहीर प्रगटन.
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : कर्जदार पूनमसिंग कपूरसिंग सुलाने यांनी राज्यघटना बचाओ संघर्ष संघ जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सावकाराच्या दुप्पट तिप्पट व्याज वसुली त्रासातून मला न्याय मिळवून द्यावा अशी लिखित तक्रार केली होती पण चतुर सावकाराने आपले पितळ उघडे पडल म्हणून त्या फसवणूक करून घेतलेल्या खरेदी खतामार्फत वकिलांकडून दि. २८/०३/२०२४ या तारखेला आपल्या वकिलामार्फत जाहीर प्रगटन एका दैनिकात टाकले सावकाराणे जर दुकान खरेदी विक्रीचा व्यवहार केला असता तर त्याने दि. १७/०२/२०२३ रोजी या तारखेला अथवा दोन दिवसानंतर जाहीर प्रगटन टाकायला हवे होते ? सावकार हा पोलीस प्रशासनाची व न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी सावकाराकडून प्रयत्न होताना दिसत आहे अशा हुशार चतुर सावकारावर कर्जदाराची दुकान बळकवण्याआधी गुन्हा दाखल करा जिल्हाध्यक्ष राज्यघटना बचावो संघर्ष संघ- गणेश महाले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सिडको एन – 7 यांना विनंती केली आहे.