कन्नड / प्रतिनिधी शिवाजी नवले / कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथे दुकान नंबर १२५ मध्ये स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी केवायसी बंधनकारक केली आहे. रेशनवरील बनावट ग्राहक व मृत लाभार्थी कमी होऊन धान्य पारदर्शक वितरण होण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ही प्रक्रिया रेशन दुकानातच केली जात आहे. शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांनी अद्याक्त असलेले आधार आवश्यक असून दुकानदाराकडे उपलब्ध करून दिलेल्या फोरजी मशिनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे स्कॅन करून ई-केवायसी करता येते.

पुरवठा विभाग कन्नड यांच्या मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याचे काम डोंगरगाव येथील राशन दुकानात चालू आहे. येथे अपंग व्यक्ती मंजित जयवंत आग्रे यांची ई केवायसी करताना राशन दुकानदार अनिल आग्रे हे मदत करीत आहे