छत्रपती (प्रतिनिधी) : आंबेडकरवादी संघर्ष समितीची बैठक सुभेदारी विश्रामगृह येथे कॅ. रमेश खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीच्या तयारीसाठी आंबेडकरवादी जयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या वेळी समितीने बाबासाहेबांच्या विचारांचा जागर घडवून आणण्याचा संकल्प केला. नव्या कार्यकारिणीत अरुण खरात यांची अध्यक्षपदी, तर संजय जाटवे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. रामराव दाभाडे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवड झाली असून, श्रावण गायकवाड हे मुख्य निमंत्रक तर संतोष मोकळे निमंत्रक म्हणून कार्य पाहतील. महासचिवपदी अंकुश शिंदे तर कोषाध्यक्षपदी कॅ. रमेश खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय स्वागताध्यक्ष म्हणून किशोर जाधव व सिद्धार्थ ठोकळ यांची निवड झाली

. सोमनाथ वाघमारे व अभिमन्यू अंभोरे यांच्याकडे प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विजय मोरे, बाळू भाऊ मगरे, राम भालेराव, सूरज मगरे, राजू मगरे, आदित्य खरात यांच्यासह अनेक सदस्यांना विविध पदे देण्यात आली आहेत. प्रमुख सल्लागार म्हणून नानासाहेब शिंदे, भाई एस. एस. जमधडे, मधुकर ठोंबरे, किशोर गडकर, मिलिंद मोकळे आदींची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण कार्यकारिणीने जयंती उत्सव भव्य आणि प्रेरणादायी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.