सिल्लोड (प्रतिनिधी- हेमंत वाघ) : सिल्लोड तालुक्यातील चिचखेडा शिवारात पूर्ण नदी वडोद बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध वाळूचा उपसा करुन त्याची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वडोदबाजार पोलिसांनी चिंचखेडा शिवारात छापा मारला असता. त्यावेळी नदीपात्रातून वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांना दिसून आले. पोलिस आल्याचे पाहताच दोन्ही ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून पळ काढला. एका ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू मिळून आली, तर दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये दोन प्लास्टीकचे टोपले, दोन फावडे आदी मिळून आले. याप्रकरणी पोलिस अंमलदार मुस्ताक युसूफ पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वाळू वाहतूक करणाऱ्याविरुध्द वडोद बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनापरवाना सिल्लोड तालुक्यातील चिचखेडा पोलीस स्टेशन वडोद बाजार हद्दीतील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा करुन त्याची वाहतूक करणारे दोन विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर वडोद बाजार एपीआय सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे दास्ती निर्माण झाले असून पोलिसांनी पकडले. ही कारवाई मंगळवार, १४ जानेवारी रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान करण्यात आली. कारवाईदरम्यान, दोन्ही ट्रॅक्टरचे चालक ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. वडोदबाजार हद्दीतील परिसरातील चिंचखेडा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणारे ट्रॅक्टरवर वडोद बाजार पोलीस स्टेशनची कारवाई करण्यात आली