छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० मे पर्यंत पोलीस कोठडी • सुनावली, याबाबत अधिक माहिती अशी की, घरघुती वाद झाल्यामुळे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने एका तरुणाकडे मदत मागितली. परंतु, तरुणाने मुलीच्या नीच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन अपहरण करून तीन दिवस लॉजवर नेवून बलात्कार केल्याची घटना १४ मे ते २६ मे दरम्यान घडली. या प्रकरणी मुलीच्या वडीलांच्या तक्रारीवरून दोन आरोपींवर पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. हेल अब्दुल रजाग कादरी (वय २५, रा. विश्रांतीनगर), आदित्य कडूबा ठिवर (वय २२, रा. विश्रांतीनगर) असे आरोपींची नावे आहे

. पोलिसांच्या माहितीनुसार, रोहिणीच्या (नाव बदलले) वडिलांचा चहा हॉटेलचा व्यवसाय आहे. रोहिणी गजानननगर येथे राहते. तीएका नामांकित शाळेत ९ वर्गात शिकते. तिच्या घरी १४ मे रोजी घरघुती वाद झाले. त्यामुळे रोहिणी रागाच्या भरात १४ मे रोजी सकाळी ती ११.३० वाजता घराबाहेर पडली. त्यानंतर ती पुंडलीकनगर रोडवर उभा असताना सोहेलकडे मदत मागितली. सोहेलने मदतीचा बहाणा करून तिला वेदांतनगर येथील शांगरीला लॉजवर नेले. दोघेजण एक रात्र सोबत राहिले. दुसऱ्या दिवशी १५ मे रोजी उमरगा येथे मामाच्या घरी गेली. मामाच्या मुलाच्या नावावर नवे सीम कार्ड घेतले. त्यामुळे मोबाईलमधील जुने सीमकार्ड बंद करून नवे सुरू केले. त्या सीमकार्डवरून रोहिणी सोहेल सोबत बोलत होती. रोहिणी मामाच्या घरून १५ मे रोजी रात्री पुन्हा त्या लॉजवर आली. १५ मे ते १७ मे पर्यंत सोहेल आणि रोहिणी सोबत राहिले. यावेळी सोहेलने रोहिणीशी शारीरिक संबंध ठेवले. रोहिणी दिवसा सिद्धार्थ गार्डन येथे काही मित्रासोबत राहायची, त्यानंतर लॉज मालकाने तांत्रिक अडचण आणल्याने सोहेलने रोहिणीला सलीम कुरेशी या मित्राच्या हुसेन कॉलनी येथील घरी १८ मे ते २० ते दरम्यान ठेवले. त्यानंतर सोहेलने त्याच्या बहिणीच्या घरी रोहिणीला २० मे ते २६ मे दरम्यान ठेवले. त्यानंतर २६ मे रोजी रोहीणीला सोहेलने सिडको बसस्टँडवर सोडले. तिथे रोहीणीने तिच्या मित्राला संपर्क करून त्याला घ्यायला बोलवले. रोहिणीच्या मित्राने तातडीने रोहिणीच्या घरी फोन करून रोहिणी येत असल्याचे कळवले. त्यानंतर रोहिणीच्या कुटुंबांनी रोहिणीच्या मित्राशी संपर्क ठेवला, रोहिणीच्या कुटुंबांने तातडीने एपीआय कॉर्नर गाठले. तेथून रोहिणीला सोबत घेत पुंडलिनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता मदतीच्या बहाण्याने सोहेलने रोहिणीवर बलात्कार केल्याचे समोर आले. दरम्यान रोहिणीला बाल कल्याण समितीपुढे सादर केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संदिप काळे करीत आहे.