फुलंब्री, (प्रतिनिधी हेमंत वाघ) : विरोधकांकडे कोणताही मुद्दा, संकल्प राहिलेला नाही. लोकांना केवळ झुलविण्याचे काम त्यांनी केले, त्यांचा विकास फक्त बोलण्यात असून हवेत झाला आहे. पण आम्ही विविध योजनेच्या माध्यमातून जनतेच्या खिशात थेट पैसा दिला, रस्ते केले, शहर व ग्रामीण भागात विकासाच्या योजना पोहोचवल्या. ‘हा सूर्य हा जयद्रथ’ असा समोरासमोर दिसणारा विकास केला आहे. त्यामुळे आता माझे हात बळकट करा, असे आवाहन भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी केले. फक्त निवडणुकीपूरते आमच्याकडे मत मागायला येणाऱ्या नेत्यांना नव्हे तर आमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असलेल्या अनुराधा चव्हाण यांनाच आम्ही मतदान करणार असल्याचे प्रचार दौऱ्यात मतदारांनी बोलून दाखवले. फुलंब्री मतदारसंघातील विविध गावांमध्ये शनिवार (दि.९) रोजी दिवसभर सकाळी सात वाजेपासूनच अनुराधा चव्हाण यांच्या प्रचाराचा झंजावात पाहायला मिळाला. यावेळी चव्हाण यांच्यासोबत फुलंब्री मतदार संघातील महायुतीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी चव्हाण यांनी भालगाव, कविटखेडा, साताळा बु., साताळ पिंप्री/गुम साताळा, पेंडगाव, पाडळी, निमखेडा, गेवराई गुंगी, गेवराई पायगा, शेलगाव, आडगाव, पिरबावडा, रांजणगाव, सुभाषनगर, गावंदरी तांडा, ओहर, रहाळपट्टी तांडा, धोपटेश्वरगाव, धोपटेश्वर वाडी, दूध पीडा, वडाची वाडी, आय्याबाबा तांडा, बनवाडी तांडा, जोगवाडा, जटवाडा, पूल तांडा, चीमंनपुर वाडी, चित्ता तांडा या गावांना भेटी दिल्या. गावागावात आगमन होताच स्थानिक गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात बँड लावून, फटाके फोडून तर औक्षण करून अनुराधा चव्हाण यांचे जोरदार स्वागत केले.

यावेळी फुलंब्री विधानसभा प्रभारी निरजंण सिन्हा, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, उपजिल्हाध्यक्ष सर्जेराव मेटे, तालुकाध्यक्ष सांडू जाधव, शिवाजी महाराज पाथ्रीकर, अप्पासाहेब पाटील काकडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाबासाहेब तांदळे, तालुका सरचिटणीस गोपाल वाघ, सुचित बोरसे, राजेंद्र डकले, सविता फुके, ऐश्वर्या गाडेकर, जगन दाढे, बाळासाहेब तांदळे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष राजू तुपे, रामेश्वर चोपडे, सुनील तायडे, माधवराव जाधव, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष दीपक तायडे, शिवाजी डिघुळे आदींची उपस्थिती होती.