फुलंब्री ( प्रतिनिधी हेमंत वाघ) ; फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील ४७ वर्षीय युवकाचा ट्रॅक्टर च्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २४ एप्रिल गुरुवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली. नितीन पांडुरंग सदावर्ते ( वय ४७ ) हे ट्रॅक्टर टँकरद्वारे वडोद बाजार येथे मार्केट कमिटी मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट मैदानावर पाणी मारून टँकर घेऊन परत जात असताना महाराष्ट्र बँक जवळ गुरुवारी रात्री आठ वाजता त्यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच २० बी ऐ ४७ ११हे पाण्याचे टँकर असलेले ट्रक्टर उतारावर उभे असताना थांबवण्याचे प्रयत्नात अपघात होऊन त्यामध्ये डोक्याला इजा होऊन याचा ट्रॅक्टरच्या टायर खाली आल्याने अपघात होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच येथील युवकांनी त्यांना फुलंब्री येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं यावेळी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले

उत्तरिय तपासणी करून शुक्रवारी सकाळी 11 वाजता वडोद बाजार येथे त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला त्यांच्या पक्षात वडील दोन भाऊ दोन भाऊ जाई पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे तो श्री सरस्वती भुवन शाळेचे सेवा निवृत्त मुख्यद्यापक पांडुरंग सदावर्ते यांचा मुलगा होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे नितीन सदावर्ते हे टँकर च्या माध्यमातून पाणी पुरवण्याचे काम करत असत त्यामुळे ते सर्वत्र परिचित होते . ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांनी त्यांच्या अपघाती निधनाबद्दल दुःख व्यक्त करीत कुटुंबीयांची भेट घेतली . या घटनेची वडोद बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलीअसून पुढील तपास स पो नि सुनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मुस्ताक पटेल हे करत आहेत