चिंचोली लिंबाजी । ओढ्याला आलेल्या पुरात एक १८ महिन्याचा चिमुकला वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घाटशेंद्रा (ता. कन्नड) येथे सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या मयत साई बोरसे सुमारास घडली. साई कडूबा बोरसे असे मयत बालकाचे नाव आहे.याविषयी अधिक माहिती अशी की, घाटशेंद्रा येथील कडूबा हरिद्वार बोरसे हे सुरमाळ टेकडीच्या उत्तरेला असलेल्या रेउळगाव पांदीला लागून असलेल्या गट नं. ३२४ मधील शेतात राहत होते. रविवारी रात्रीपासून चिंचोली लिंबाजीसह घाटशेंद्रा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी सकाळी घाटशेंद्रा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने कडूबा बोरसे राहत असलेल्या पांधी नाल्याला मोठा पूर आला. या पुराचे पाणी बोरसे यांच्या घरात शिरले. आई घरात स्वयंपाक करीत होती तर मुलाचे वडील घरातील साहित्य बाजूला लावत

असताना मुलगा खेळत खेळत वडिलांचे मागे आला. वडील कामात व्यस्त असताना अचानक पाणी वाढल्याने घरात खेळत असलेला साई हा पाण्यात वाहून गेला. घरात साई दिसत नसल्याने आईने पतीला साई विषयी विचारणा केली असता दिसून आला नाही. त्यांना संशय आल्याने त्याचा शोध घेतला असता तो वाहून गेल्याचे दिसले.